एक अविस्मरणीय अनुभव... डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा... एकदा बघून मन भरणार नाही.. पुन्हा पुन्हा जाव लागतयं...
वर्षभर तिकीटाच्या प्रतिक्षेत होतो आणि फायनली मिळालीच... मुंबई भागात होणारे जवळपास सर्वच show सेंट्रल लाइन ला होतात... मधेच एकदा दादरला झालेलं तेही काही तासात हाऊसफुल्ल... मध्यंतरी folk आख्यानच्या insta account वरुन एक पोस्ट आलेली.. मुंबईत लवकरच show होणार होता.. तिकीट वितरणाची तारीख आणि वेळ जाहीर केलेली... मोबाईल वर Reminder लाऊन घेतलं आणि तिकीट बुक करुन घेतलं...
Folk आख्यान तुम्हाला YouTube किंवा Instagram च्या video पाहून समजणार नाही... त्यासाठी तुम्हाला आख्यानाचा थाट पाहायला याव लागेल आणि तो अनुभव प्रत्यक्ष घ्यावा लागेल...सादरकर्ते सादरीकरणात एवढे मश्गुल असतात की ते आनंद ते स्वतः घेतात आणि त्यामुळेच प्रेक्षक म्हणुन पाहताना आपल्याला आनंद घेता येतो...अवघ्या महाराष्ट्राच्या लोककलेची वारी घडवून आणणारा असा हा लोकसंगीताचा सोहळा... गण, घाटोळी, बोबडी गवळण, वाघ्या मुरळी, ताल कचेरी, जात्यावरची ओवी अशा विविध प्रकारातील सांगीतिक थाट ऐकताना कधी अंगावर शहारे येतात, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या होतात तर कधी बेभान होऊन नाचायचे मन करते...
प्रत्येक मराठी माणसाने पाहायलाच पाहिजे असा हा लोकसंगीताचा सोहळा - the folk आख्यान... थाट ह्यो जूना, खेळ हा नवा...








No comments:
Post a Comment