Friday, 13 February 2026

मोरोशीचा भैरवगड - शिवशौर्य ट्रेकर्स सोबत - ०७.०२.२०२६

‎शिवशौर्य ट्रेकर्स मधील सिद्धार्थ दादांनी (मोहीम प्रमुख) महिनाभरापूर्वी मेसेज केलेला... मोरोशीचा भैरवगड... ३ वर्षा पुर्वी बाइक accident मधे उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती... त्यामुळे द्विधा मनस्थितीत होतो.. जाऊ की नको...कारण भैरवगड म्हटलं की climbing आणि rappling आलं... ह्याआधी कधी climbing, rappling केल नसल्यामुळे माहिती नव्हत की, चढताना उतरताना हाता खांद्यावर किती लोड येतो? दादांनाच कॉल केला आणि सर्व हकिगत सांगितली... त्यांनी काही बाबी समजवून सांगितल्या आणि मी ट्रेक फी भरून माझी सीट कन्फर्म केली...

 ट्रेक ला १०/१५ दिवस बाकी असताना शिवशौर्य ट्रेकर्स मधील सचिन दादांचा (मोहीम कार्यवाहक) कॉल आला... त्यांनी इतर चौकशी केली, जसे... हाइटचा फोबिआ आहे का...आता पर्यन्त किती ट्रेक केलेत... Recently किती ट्रेक केले आहेत... शरीराने जाड आहे की मध्यम, सडपातळ... ह्यापूर्वी climbing किवा rappling केलेली आहे का... असे आणखीन काही... सर्व clear करून त्यांनाही खांद्याची पूर्वकल्पना दिली... आता कुठे सीट कन्फर्म झाली... वेळेवर खांदा दुखायला किंवा वेगळं काही व्हायला नको म्हणुन मी हाता खांद्याची exercise सुरू केली... जायच्या एक आठवडा आधी ६ तारखेचा हाफ डे आणि ७ तारखेची रजा सांगून ठेवली... रात्री १० वाजता दादरहून बस सुटणार होती, पण दोन तीन दिवसांपूर्वी नियोजनात बदल केला गेला... कल्याण येथे होणारा ट्राफिक जाम टाळण्यासाठी टिटवाळा येथे ट्रेन ने जाऊन तिथून बस केली होती... त्यामुळे WhatsApp समूहावर मतमतांतरे सुरू होती... काहींनी दादर येथून बस सुटणार होती ह्या हिशोबाने आपापल्या कामकाजाच्या वेळा निश्चित करून सीट कन्फर्म केलेली होती... मला दोन्ही पैकी कोणताही ऑप्शन चालला असता... संध्याकाळी निघणार होता म्हणुन हाफ डे निघून घरी येऊन बॅग भरून इतर कामे आवरून घेतले... WhatsApp समुहावर दादर येथून टिटवाळ्याला जाण्याचा ट्रेन ची वेळ दिलेली होती.... वेळ होती 9:50 आणि मी 9:30 वाचलं.... पालघर वरुन 7:40 वाजता सुटणाऱ्या लोकलची दादरची वेळ होती 9:10... ट्रेन ला उशीर झाल्यास 9:30 ची (जीची वेळ 9:50 होती) लोकल मिळायची नाही... ह्या हिशोबाने आधीच्या 6:20 च्या चर्चगेट लोकल ने जायच ठरवलं... 
6 वाजता घरुन निघालो... पार्किंग मधे पोहोचला तेव्हा ट्रेनची announcement सुरू होती... पटरी क्रॉस करून प्लॅटफॉर्मवर पोहचलो... लोकल आली ती भरूनच... पालघर वरुन चढणाऱ्यांचीही गर्दी होतीच... कसाबसा बॅग सांभाळत आत पोहचलो... वसई स्टेशन आल्यावर बसायला जागा मिळाली तीही चौथ्या सीटवर ... 8:30 पर्यंत दादरला पोहचलो...स्टेशनातून बाहेर पडून थोड खाऊन घेतल आणि भरपूर वेळ होता म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन लोकल पकडण्यासाठी गेलो... तिथून टिटवाळ्यापर्यंतचा प्रवासात एकटाच होतो...पुस्तक सोबत होतेच... बाकीचे मागच्या लोकल ने येणार होते...तासभर पुस्तक वाचून झाल्यावर डोळे मिटायला लागले... टिटवाळ्याला उतरल्यावर जाधव काका भेटले.. ते ह्याच लोकल ला होते... अर्धा तासाने सिद्धार्थ दादा वैगरे मंडळी आली... स्टेशनातून बाहेर पडल्यावर सागर दादा, अमिता ताई ह्यांची भेट झाली... 

टेम्पो ट्रॅव्हलर मधे बसून आमचा प्रवास सुरू झाला... साधारण दोन तासांचा प्रवास करून आम्ही मोरोशी गावात पोहोचले...पहाटेचे तीन वाजले होते... पाच वाजता उठून फ्रेश होऊन, नाश्ता करून सहा वाजता निघायचे होते... दोन तासाची साखर झोप घेऊन सर्व रेडी होई पर्यंत 6 वाजून गेले...निघायच्या आधी सर्वाना हेल्मेट आणि हार्नेस सोबत बाळगण्यासाठी दिले... ग्रुप फोटो काढून आणि छत्रपतींचा जय घोष करून 6:30 वाजता ट्रेकला सुरुवात झाली... 

अंधुक प्रकाशात पायवाटेवरून मुरुम दगड तुडवीत साधारण अर्धा पाऊण तासात आम्ही पहिला टप्पा पूर्ण केला, जिथे सोबत दिलेले हेल्मेट आणि हार्नेस घालून पुढील ट्रेक करायचा होता... तिथून भैरवगडाचे मनमोहक दृश्य दिसते... 








तत्पूर्वी carabiner (कॅराबिनर) मधून आम्ही भैरवगडाचे फोटो घेतले... पुढचा प्रवास सुरू झाला... सागर दादा आणि अमिता ताई सोबत गप्पा, थट्टामस्करी करत चढाई सुरू होती... 
चढताना मुरुमाड आणि बारीक खडीवर पाय रोवत चालताना चढायच्या आधीच उतरताना काय हालत होणार आहे ह्याची भीती सतावू लागली... त्यात सिद्धार्थ दादांसोबत त्यांच्या मिसेस आणि राठोड मॅडम होत्या... दोघीही 40 प्लस... त्यांनी रनिंग शूज घातले होते, जे बारीक खडीवर लगेच घसरतात... आता मला माझ्या पेक्षा त्यांचीच जास्त भीती वाटू लागली, की उतरताना ह्यांची काय हालत होईल... पण दादा त्यांच्या सोबत होते.. वेळोवेळी त्यांना 'मार्ग' दर्शन करत होते... दादांनी माझ्याकडे एक खडू दिलेला... जिथे जिथे दोन रस्ते लागतील तिथे दिशा दर्शक बाणाचे चिन्ह करायचे होते... 
पुढे गेल्यावर एका कातळाला तीव्र उतार आहे.. जिथे रोप बांधली होती... कॅराबिनर रोपला लावून तेवढा पॅच क्रॉस करून घेतला... 





पुढे गेल्यावर आणखीन एक साधारण पंधरा फुटाचा छोटा पॅच लागतो, जिथे रोपला पकडून वर चढायचं होत... पुढे गेल्यावर पुन्हा एक कातळाची अरुंद चढन लागते... आणि दोन्ही बाजूला दरी... तिथे पोहोचल्यावर प्रचंड वारा स्वागत करायला तयारच होता...त्यामुळे कातळाला हात टेकत, त्याचाच आधार घेत आम्ही वर पोहचलो... 

साधारण दोन तासांनी आम्ही भैरवगडाच्या पायथ्याशी पोहोचले...जिथून कोरीव पायरी मार्ग सुरू होतो... आता इथून पुढे खरा थरार अनुभवायचा होता... ह्याच साठी केला होता अट्टहास... आम्ही सर्वात शेवटी होतो.. आमच्यातली बरीचशी मंडळी पायरी मार्ग चढत होते.. काही चढून वर गेलेले... खाली एक दादा नाव आणि मोबाईल नंबर घेत होते... ज्यांना कोणाला rappling करताना ड्रोनने विडिओशुट करायच असेल त्यांची.... हा अनुभव विडिओ च्या स्वरुपात पुन्हा घेता यावा म्हणून मीही नाव, नंबर दिला... 
आता पायरी मार्गाची चढाई सुरू झाली... कॅराबिनर रोपला लावून चढायचं असते, त्यामुळे भीती नसते... फक्त अरुंद पायरी मार्ग आल्यावर जपून पाउल टाकावे लागतात.. जेणेकरून तोल जाऊ नये... तोल गेला तरी रोप मुळे आपण लटकून राहू, पण कातळाला आपटून हाता पायाला इजा होऊ शकते...
पुढे एक पॅच असा येतो जिथे पायरी मार्ग निमुळता होत जाऊन संपतो आणि तिथूनच साधारण साडे चार ते पाच फुट उंचीवर चढायच असते... कमळू दादा आणि त्यांची टेक्निकल टीम मार्गदर्शन आणि मदतीसाठी होतीच... Instagram वर भैरवगडाच्या विडिओ पाहिल्या होत्या, त्यात ह्या पॅचचे बरेच विडिओ होते... त्यामुळे काय करायच आहे ह्याची पूर्वकल्पना होतीच... उजवा पाय आणि हात कातळात रोवून, डाव्या हाताने रोप घट्ट पकडायचा होता, तसेच डावा पाय डायरेक्ट वर घेऊन हाताच्या जोरावर वर चढायचं होतं...उजवा खांद्याच्या दुखापतीमुळे वाटलं होतं त्याच्या पेक्षा लगेच आणि आरामात तो पॅच क्रॉस केला... पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एका चौकोनी छिद्रातून आपण एका अरुंद खोलीत पोहोचतो, जी पूर्वी पाण्याची टाकी असू शकते... त्या खोलीत छोटी लाकडी शिडी बनवुन ठेवलेली आहे, ती चढून आपण पुन्हा पायरी मार्गावर येतो... 



अस करत करत आपण पोहोचतो गड माथ्यावर... सर्व एकत्र जमल्यावर सर्वानी सोबत आणलेला खाऊ शेअर केला... गप्पा, फोटो मधे एक तास निघून गेला... 



सागर दादा तिरंगा घेऊन आलेले... जवळपास सर्व गेल्यावर त्यांनी तो बॅगेतून काढला...आधीच काढला असता तर प्रत्येकानी फोटो विडिओ साठी घेऊन आणखीन एक तास घालवला असता... सर्व गेल्यावर आणि पायरी मार्गावर उतरताना तसेच Rappling करताना वेळ जाणार होता म्हणुन आम्ही मनसोक्त फोटो विडिओ काढून घेतले...




पायरी मार्गावर उतरताना कलावंतीण ट्रेकची आठवण झाली... Rappling करताना वेळ जात होता म्हणुन पायरी मार्गावर बसून ड्रोन आल्यावर हात करायच सोडून दुसरा उद्योग नव्हता.... 


आणि तो क्षण आला... पहिल्यांदाच rappling करणार होतो.. उत्सुकता होतीच सोबत थोडी भीतीही...भीती उंचीची नव्हती, उतरताना काही आपल्याकडून काही गडबड तर नाही ना होणार ह्याची... आधी सागर दादा गेला, त्यानंतर अमिता ताई.. नंतर मी... शेवटी सिद्धार्थ दादा... विडिओत पाहिल होतं, आधी स्वतःला झोकून द्यायचे होते आणि हळू हळू उजव्या हाताने रोपला डील देत खाली यायचे होते...कमळू दादा आणि त्यांची टीम मार्गदर्शनासाठी होतीच... आणि अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे उतरलो..


 खाली उतरल्यावर कमळू दादांसोबत एक सेल्फी घेतली... माझ्या मागून सिद्धार्थ दादा उतरले... आता पुन्हा दोन अडीच तासांची पायपीट होती आणि आधी सांगितल्याप्रमाणे उतरणीवर घसरायचे चान्सेस अधिक... अशा वेळी हातातील स्टिकच्या सपोर्टचा आधार खूप महत्वाचा...शूजचे सोल झिजल्यामुळे प्रॉपर ग्रिप मिळत नव्हते, त्यामुळे काही ठिकाणी हात टेकून, काही ठिकाणी बसून उतरण्याशिवाय पर्याय नव्हता... कारण पाय घसरला तर हात पाय मुरगळण्याचे चान्सेस होते आणि अजून बरीच उतरण उतरायची बाकी होती...
 


















आम्ही 5/6 जण सोडले तर बाकीचे सर्व मंडळी अर्धा पाऊणतास आधीच पोहोचले होते... आम्ही फ्रेश होऊन जेवून घेतल... काही वेळाने सिद्धार्थ दादा, त्यांच्या मिसेस आणि राठोड मॅडम आल्या...पुन्हा परतीचा प्रवास सुरु... टेम्पो ट्रॅव्हलरने आम्ही 6:45 वाजता टिटवाळा स्टेशनवर पोहोचले... तिथून सर्व जण आपापल्या मार्गाने निघाले... आम्ही वसई-विरार, पालघर वाले कोपरला उतरले... पनवेल वरुन 7:05 वाजता सुटणारी डहाणू मेमू कोपरला 7:55 ला होती, जी पालघरला 9:30 वाजता पोहचते...पण ट्रेन खूपच उशिरा आली... 9:30 कोपरलाच झाले... पालघरला पोहोचायला 11:30 वाजले... 
‎शिवशौर्य ट्रेकर्स सोबत ट्रेकिंग ला जाण्याची माझी तिसरी वेळ होती... नियोजन वैगरे उत्तम होत... मोहीम प्रमुख सिद्धार्थ दादा आणि मोहीम कार्यवाहक सचिन दादांचे मनापासून आभार, ज्यांनी मला ट्रेकला यायची संधी दिली... ईथे आवर्जून सांगावं वाटते की, मोहिमेत सुरक्षेच्या दृष्टीने आणि गडावर चढता उतरताना ट्राफिक व्हायला नको म्हणुन सदस्य संख्या फक्त वीस ठेवली होती...नाहीतर आता बरेचसे ग्रुप पाहायला मिळतात जे अश्या खडतर ठिकाणीही 40/50 पेक्षाही जास्त लोक घेऊन जातात... जेवढी जास्त संख्या तेवढी जास्त कमाई... कमळू दादा कडून कळालं दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवारी 200 हून अधिक जण येणार होते...म्हणुन शक्यतो ट्रेकिंग ला जाताना शनिवार, रविवार टाळलेलाच बरा... 
‎धन्यवाद...! 

‎अक्षय किणी
‎IG - akshaykini123

No comments:

Post a Comment