Thursday, 1 August 2024

26 जानेवारी 2024

या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त हे वर्ष शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानेही हे वर्ष साजरे करण्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमा अंतर्गत समस्त दुर्गप्रेमी, शिवप्रेमी ह्यानी २६ जानेवारी २०२४ रोजी स्वराज्यातील ३५० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा व तिरंगा ध्वज फडकविला.

No comments:

Post a Comment