Friday, 25 August 2023

किल्ले_वसई_मोहिम_परिवार अंतर्गत पहिल्या राष्ट्रध्वजाच्या स्मृती जपण्यासाठी #भारताच्या_पहिल्या_राष्ट्रध्वजास_मानवंदना_मोहिम १९ व २० ऑगस्ट २०२३

#किल्ले_वसई_मोहिम_परिवार अंतर्गत पहिल्या राष्ट्रध्वजाच्या स्मृती जपण्यासाठी #भारताच्या_पहिल्या_राष्ट्रध्वजास_मानवंदना_मोहिम
१९ व २० ऑगस्ट २०२३ 
सदर मोहिमेचा शुभारंभ जंजिरे वसई किल्ल्यावरील नरवीर चिमाजी आप्पा स्मारकात दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ७.१५ वाजता #माजी_महापौर_श्री_प्रवीण_शेट्टी व जेष्ठ लेखिका, #साहित्यिका_सौ_विणा_ताई_गवाणकर ह्यांच्या हस्ते करण्यात आला. 
पालघर जिल्ह्यातील जवळपास तब्बल ४० ऐतिहासिक स्थळांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाचा जयजयकार करण्यात आला. या ऐतिहासिक स्थळांत १५ दुर्ग गडकोट, २५ मंदिरे, समाध्या, टेहळणी बुरुज, कोट, प्राचीन बंदरे यांचा समावेश करण्यात आले होते. या सर्व स्थळी भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजास मानवंदना व इतिहास मार्गदर्शन भटकंती करण्यात आली. दोन दिवसांत पालघर जिल्ह्यातील एकूण ४० ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची ही उत्तम संधी होती. ती आम्हाला इतिहास अभ्यासक  व किल्ले वसई मोहिम प्रमुख श्रीदत्त दादांमुळे मिळाली. 
संपूर्ण दोन दिवसीय मोहिमेत ऐतिहासिक स्थळांवर दादांनी सहभागी सभासदांना इतिहास मार्गदर्शन केले. 
#इतिहास : जगातील सर्व राष्ट्रांना आपले स्वतंत्र ध्वज आहेत. त्या ध्वजांना तेथील जनमानसात स्वतंत्र मान आणि आदर आहे. भारतीयांनी ध्वज ही कल्पना राबविली तेव्हा भारताचा तिरंगा काही एका दिवसात तयार झाला नाही. त्याला एका शतकापूर्वी निर्माण झालेल्या संकल्पनाची पार्श्वभूमी आहे. २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनमधील स्टुटगार्ड या शहरात जागतिक समाजवाद्यांची परिषद भरली होती. त्या ठिकाणी भारताच्या प्रतिनिधी म्हणून असलेल्या मादाम कामांनी युनियन जॅक न घेता आपल्या कल्पनेने साकार केलेला स्वतंत्र असा ध्वज भारताचा म्हणून सादर केला. मादाम कामा यांनी सन १९०७ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा आद्य राष्ट्रध्वज फडकवला. ऑगस्ट १९३७ मध्ये सदर ध्वजाचे भारतात आगमन झाले. पुण्यात पोहोचल्यावर ध्वजाची मोठी मिरवणूक काढण्यात आली. केसरीवाडा ते पुणे रेल्वे स्थानक या मार्गावर निघालेल्या या मिरवणूकीत खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर सहभागी झाले होते. ध्वजाच्या आरेखनात स्वा. सावरकरांचे योगदान होते. हिंदू मुस्लिमांमध्ये एकोपा साधण्याच्या हेतूने सावरकरांनी ध्वजावर अनुक्रमे सूर्य आणि चंद्र या चिन्हांना स्थान दिले होते यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून यावी. आजही हा ध्वज पुण्यात केसरीवाड्यात ठेवण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या व विविध ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असणारा ध्वज आपण भारताचा पहिला राष्ट्रध्वज म्हणून संबोधतो. या प्रदीर्घ वाटचालीच्या काळात चक्क ३४ ध्वज उदयास येऊन गेले आणि "तिरंगा" हा ३५ वा.

No comments:

Post a Comment